गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना | माझा महान्यूज

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

 


राज्यात शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवितो किंवा अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तिस झालेल्या अपघातामुळे कुंटूंबाचे उत्पनाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास / त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता. कोणतेही स्वतंत्र विमायोजना नसल्यामुळे शासनाने सन २००५-०६ पासून अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांसाठी विमा योजना कार्यान्वित केली आहे.

 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत शेतकरी कुंटुंबास आर्थिक लाम देण्याकरिता राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी शेतकऱ्याच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य (आई-वडिल, शेतकऱ्याची पती-पत्नी, मुलगा अविवाहित मुलगी, यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वयोगटातील एकूण जणांना योजनेचा लाभ मिळणार आहे.. 

 योजनेची वैशिष्ट्ये :

  •  राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी शेतकऱ्यांचे कुंटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य (आई-वडिल, शेतकऱ्याची पती-पत्नी, मुलगा अविवाहित मुलगी, यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वयोगटातील एकूण जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेसाठी लाभ प्रदान करण्यासाठी कुटुंबाच्या व्याख्येमध्ये शेतकऱ्याचे (आई-वडिल, शेतकऱ्याची पती-पत्नी, मुलगा अविवाहित मुलगी, यापैकी कोणतीही एक व्यक्ती) यांचा समावेश ग्राह्य धरण्यात यावा.
  • योजनेंतर्गत देय लाभ सदर योजनेअंतर्गत अपघात ग्रस्त शेतकऱ्यांना /त्यांच्या कुटुंबियांस प्रकरणपरत्वे खालील प्रमाणे लाभ अनुज्ञेय राहील

.क्र.

अपघाताची बाब

नुकसान भरपाई 

1

अपघाती मृत्यू

रु.2,00,000/-

2

अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच  एक डोळा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास

रु.2,00,000/-

3

अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास

रु.1,00,000/-

  •  सदर योजना कालावधीत संपुर्ण दिवसासाठी म्हणजेच विहित कालावधीतील प्रत्येक दिवसाच्या २४ तासांसाठी हि योजना लागू राहिल. या कालावधीत वहितीधारक खातेदार शेतकरी शेतकऱ्यांचे कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य यापैकी कोणत्याही व्यक्तिला केव्हांही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरीही ते योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र राहतील.
  • सदर योजने अंतर्गत लाभास पात्र असलेल्या शेतकऱ्याने / शेतकऱ्याच्या कोणत्याही वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभास पात्र ठरणार नाहीत
  • योजना कार्यान्वयीन यंत्रणा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत शेतकरी/वारसदारास तातडीने मदत मिळणेसाठी तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती स्थापन करुन जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी याचे अध्यक्षतेखाली जिल्हा अपिलिय समिती गठीत करण्यात आली आहे.

लाभार्थी पात्रता :-

  •  महाराष्ट्र राज्यातील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदी नुसार खातेदार असलेला शेतकरी वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला उक्त मुददा क्र. अन्वये शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही सदस्य.
  • वारसदार : अपघातग्रस्ताचे निधन झाल्यास त्यांच्या कुंटुंबातील वारसदाराची निवड सानुग्रह अनुदानाची रक्कम पुढील प्राथम्य क्रमानुसार अदा करावी.
  • 1) अपघातग्रस्त यांची  पत्नी/अपघातग्रस्त स्त्रीचा पती 2) अपघातग्ग्रस्ताची अविवाहित मुलगी 3) अपघातग्रस्ताची आई  4) अपघातग्रस्ताचा मुलगा 5) अपघातग्रस्ताचे वडिल  6) अपघातग्रस्ताची सुन 7) अन्य कायदेशीर वारसदार

योजनेमध्ये समाविष्ठ असलेल्या बाबी

 1) रस्ता / रेल्वे अपघात, 2)पाण्यात बुडून मृत्यू 3) जंतुनाशके हताळताना अथवा अन्य कारणाने विषबाधा4) विजेचा धक्का बसल्याने झालेला अपघात 5) वीज  पडून मृत्यू.  6) खुन. 7) उचावरून पडून झालेला अपघात, 8) सर्पदंश विंचूदंश. 9) नक्षलाईट कडून झालेल्या हत्या, 10) जनावरांच्या खाल्यामुळे / चावल्यामुळे जखमी / मृत्यु, 11) बाळतपणातील मृत्यू  12) दंगल  13) अन्य कोणताही अपघात

 योजनेमध्ये समाविष्ठ नसलेल्या बाबी :-

 1) नैसर्गिक मृत्यू, 2) विमा कालावधी पुर्वीचे अपंगत्व 3) आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपुर्वक स्वतःला जखमी करुन घेणे, 4) गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात 5) अमंली पदार्थाच्या अमंलाखाली असताना झालेला अपघात, 6) भ्रमिष्ठपणा 7) शरिराअंतर्गत रक्तस्त्राव 8) मोटार शर्यतीतील अपघात 9) युध्द, 10) सैन्यातील नोकरी, 11) जवळच्या लाभधारकांकडून खुन.

 आवश्यक कागदपत्रे

 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत लाभ प्राप्त होणेसाठी प्रस्तावासोबत (क्लेम फॉर्म, भाग-) खालील कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.

  1.  7/12 उतारा
  2. मृत्यूचा दाखला
  3. शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गांव नमुना नं. नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद.
  4. वारसदाराचे ओळखपत्र आधारकार्ड/ पॅनकार्ड/बैंक पासबुक/निवडणुक ओळखपत्र
  5. अपघातग्रस्ताचा वयाचा दाखला जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र / ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र /आधार कार्ड/पॅन कार्ड/ वाहन चालविण्याचा परवाना / पारपत्र / निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र
  6. प्रथम माहिती अहवाल / घटनास्थळ पंचनामा / पोलिसपाटील माहिती अहवाल
  7. अपघाताच्या स्वरुपानुसार अंतिम प्रस्तावासोबत सादर करावयाचे कागदपत्र (पपत्र-)

 अर्ज प्रक्रिया :

ऑफलाइन

  •  संबंधित अपघातग्रस्त शेतकरी/ शेतकऱ्याच्या वारसांनी सर्व विहित कागदपत्रांसह संपूर्ण दावा प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे 30 दिवसांच्या आत सादर करावा लागेल.
  • अपघातग्रस्ताची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर संबंधित महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या पथकाने घटना घडल्यापासून 8 दिवसांच्या आत तहसीलदारांना भेट देऊन अहवाल सादर करावा लागेल.
  • तालुका कृषी अधिकाऱ्यांनी प्राप्त झालेल्या दाव्याच्या प्रस्तावांची छाननी करून पात्र हक्क प्रस्ताव संबंधित तहसीलदारांना सादर करावेत.
  • तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीत शेतकरी/ शेतकरी कुटुंबाच्या वारसांना मदत देण्यासाठी 30 दिवसांच्या आत निर्णय घेण्यात येईल आणि त्यानंतर अपघातग्रस्तांच्या बँक खात्यात ECS द्वारे निधी अदा करण्यात येईल.

majhamahanews

Soratemplates is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image

0 $type={blogger}:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

"Perplexity AI चा धाडसी प्रयत्न – $34.5 अब्जांत Google Chrome विकत घेण्याची ऑफर"

 प्रस्तावना तंत्रज्ञानाच्या दुनियेत कधी कधी असे प्रसंग घडतात की ज्यामुळे सगळीकडे चर्चेचा भडका उडतो. नुकतंच असंच काहीसं घडलं आहे Perplexity AI चे CEO आणि सह-संस्थापक अरविंद श्रीनिवास यांच्या धाडसी पावलामुळे. त्यांनी Google Chrome ब्राउझर विकत घेण्यासाठी तब्बल $34.5 अब्जांची ऑफर दिली . ही ऑफर केवळ पैशांची बाब नाही तर जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एकाला सरळ स्पर्धा देण्याची घोषणा आहे.